गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
आॕल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)पक्षाचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असद्दुदीन ओवेसी यांच्या विचारांना प्रेरित होऊन विविध ठिकाणी मोठ्याप्रमाणात युवक एआयएमआयएम पक्षात प्रवेश करती असल्याने विविध राजकिय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहे. Aimim entry in gadchandur पक्षाचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी राज्य अध्यक्ष खासदार इम्तियाज़ जलील यांच्या पुढाकाराने व राज्य प्रवक्ता तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी प्रा.जावेद पाशा यांच्या मार्गदर्शनाने ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील एरिगेशन विश्रामगृह येथे नुकताच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन होते तर जिल्हा महासचिव मौलाना साजीद अंसारी,मिडिया प्रभारी अज़गर भाई,सोहेल मिजवाही,अनीस कुरेशी,सैय्यद आसीफ,शेख अतीक,शेख साकीब यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.यावेळी नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.कोरपना तालुकाध्यक्ष मोहम्मद रफीक शेख,गडचांदूर शहराध्यक्ष शेख मुन्नु शेख शरीफ़, उपाध्यक्ष शेख रऊफ मो.शरीफ़, सचिव शेख दस्तगीर, मिडिया प्रमुख शेख इब्बू शेख कादर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.'हमारा काम ही,हमारी पहचान है' असे म्हणत पक्षाचे ध्येयधोरणाची माहिती देताना जनतेच्या कामासाठी झटण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले. सदर कार्यक्रमात रफीक निझामी,इर्शाद कादरी,अनीस कुरेशी, मौलाना अकबर,नासीर खान,शेख कादर, मो.फैज़ शेख, हाजी शब्बीर ढाकवाला,शोएब जिलानी, माजी नगरसेवक अब्दुल हफी़ज़,तिलक पाटील यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.