चंद्रपूर - चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून महागड्या गिअर व विना गिअर च्या सायकल चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मुळे यांनी गुन्हे शोध पथकातील हर्षल एकरे यांना सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे निर्देश दिले.Bicycle thief
गुन्हे शोध पथक सदर प्रकरणाचा तपास करीत असताना फुकटनगर चंद्रपूर येथील 19 वर्षीय राजेश रमेश पवार याला अटक करण्यात आली.
अधिक तपास केला असता शहरात घडत असलेल्या सायकल चोरीच्या घटनेत स्वतःचा सहभाग असल्याची कबुली दिली. Crime news
राजेश पवार ने तब्बल 21 सायकली चोरी केल्या, महागड्या गिअर व विना गिअर असा संपूर्ण 1 लाख 88 हजारांचा मुद्देमाल रामनगर पोलिसांनी जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामनगर मुळे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले व गुन्हे शोध पथकांनी केली.
चंद्रपूर शहरातील ज्या नागरिकांच्या सायकली चोरी गेल्या असतील त्यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये सम्पर्क साधावा असे आवाहन रामनगर पोलिसांनी केल्या आहे.