प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने यावर्षीच्या वार्षिक नियोजनाची सभा नेफडोच्या नागपूर विभाग सचिव रत्ना चौधरी यांचे निवस्थानी आयोजित करण्यात आली. वार्षिक नियोजन सभा क्रांती सूर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मुल नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा.सौ. तेजस्विनी नागोसे मॅडम यांनी उपस्थित सभासदांना सभेच्या आयोजना मागची भूमिका सविस्तर विषद केली. नंतर मा. तेजस्विनी नागोसे यांची राज्य उपाध्यक्ष पदी पदोन्ननती झाल्याबद्दल नेफडो परिवारातर्फे शेवंतीचे रोप देऊन उपस्थित सर्वांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .सचिव रत्ना चौधरी यांनी कोरोनाचे वाढते संसर्ग लक्षात घेऊन मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांना वानांत Mask मास्कचे वाटप करण्यात आले. व प्रत्येक पदाधिकारी यांचेकडे दिलेली जबाबदारी आठवणीने व उत्साहाने पार पाडावी असे आवर्जून सांगितले. प्रसंगी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ. नागोसे मॅडम, नागपूर विभाग सल्लागार प्रा. रत्नमाला भोयर , नागपूर विभाग सचिव रत्ना चौधरी, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा ललिता मुस्कावार यांनी वार्षिक नियोजनाची बाबतची माहिती उपस्थित सभासद यांना समजावून सांगितली. सभेला ,चंद्रपूर जिल्हा संघटिका कविता मोहुर्ले , ज़िल्हा संघटक श्रीरंग नागोसे ,गुरुदास चौधरी, मूल तालुका उपाध्यक्ष राजमालवार मॅडम, तालुका सचिव गोंगले मॅडम, तालुका संघटक गुरु गुरनुले, नंदा शेंडे ,वंदना गुरनुले , इंदू मांदाडे , मेश्राम मॅडम, मोहुर्ले मॅडम, वाढई मॅडम, गौरी चौधरी, शशिकला गावतुरे तसेच पोंभुर्णा तालुका संघटक संजय नागूलवार सर उपस्थित होते.