चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली ते घुघुस रोडवर असलेले अति प्रदूषणाचे कारण अवैध कोल डेपो बंद होण्याच्या मार्गावर आहे. Air pollution
औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वीज कंपन्या आहे, या कंपन्यांना वेकोलीच्या माध्यमातून कोळसा मिळतो मात्र त्या कोळश्यातही मोठ्या प्रमाणात धांदली होत आहे.
वेकोली खाणीतून चांगल्या दर्जाच्या कोळश्याची उचल करीत तो कोळसा या कोल डेपो वर खाली करून निकृष्ठ दर्जाचा कोळसा वीज कंपन्यांना द्यायचा व चांगल्या दर्जाच्या कोळश्याची खुल्या बाजारात विक्री करायची हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे.
विशेष म्हणजे सदर कोल डेपोला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, या कोल डेपोच्या माध्यमातून प्रदूषण व परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रशासन सुद्धा यावर कारवाई तर काय बोलणेही टाळतात. Coal pollution
मात्र 8 जानेवारीला चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी याबाबतीत आंदोलन करीत प्रदूषण करणारे व अवैध कोलडेपो बंद करण्यासाठी आंदोलन केले. Shiv sena news
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी करे यांनी सदर coal depot area कोलडेपो महिन्या भरात बंद होणार असे आश्वासन शिवसेनेला दिले.
याबाबत pollution board प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी करे यांच्याशी सम्पर्क केला असता त्यांनी कोलडेपो लवकर बंद होणार असून त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. Shiv sena leader
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाची दखल प्रशासनाला घ्यावी लागली असून प्रदूषण करणारे कोलडेपो बंद होण्याच्या मार्गावर आले आहे.
कोलडेपो बंद करण्यासाठी प्रशासनाने दिरंगाई केल्यास या कोलडेपो चा मुद्दा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर ठेवत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती संदीप गिर्हे यांनी यावेळी दिली.
