चंद्रपूर/घुघुस - 17 ऑगस्ट 2011ला घडलेल्या हत्याकांडातील आरोपीं हे 2013 ला पॅरोल वर बाहेर आले होते मात्र त्या दिवसापासून ते दोन्ही आरोपी फरार झाले होते मात्र तब्बल 9 वर्षांनी स्थानिक गुन्हे शाखेने त्या आरोपींना जेरबंद केले आहे.
Double murder accused
पोलीस स्टेशन घुघुस हद्दीतील ताडाळी टी पॉईंट येथे नागो ऋषी रेडलावार यांचा ढाबा होता, त्याचठिकानी सुनील रमेश साखरकर यांचा पान ठेला होता, दोघे एकमेकांचे नात्यातील सासरे जावई होते.
त्यांच्या धाब्यावर चंदू कांबळे हा आपल्या पत्नी व मुलासहित काम करीत होता.
17 ऑगस्ट 2011 ला चंदू याने नागो रेडलावार यांना 3 महिन्याचा पगार मागितला असता दोघात त्या कारणावरून वाद झाला.
पगार का मागितला या कारणावरून नागो यांनी चंदू ला खोली खाली करण्यास सांगत त्याला थापड मारली, मात्र चंदू ने पुन्हा पगाराची मागणी केली.
त्यावेळी नागो व त्याचा जावई सुनील या दोघांनी चंदू चे हात पकडत त्याच्यावर चाकूने वार केले, चंदू ला वाचविण्यासाठी त्याची पत्नी शहनाज मध्ये आली असता तिच्यावरही दोघांनी चाकूने वार करीत जखमी केले.
जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात आणले मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलीस स्टेशन घुघुस मध्ये दोघांवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. Husband and wife murdered
पती-पत्नीची अत्यन्त क्रूरपणे हत्या करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
नागपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना दोन्ही आरोपी 4 मे 2013 ला Payroll पॅरोल वर बाहेर आले, 15 दिवसांची रजा सम्पल्यावर ते दोघे परत कारागृहात न येता पसार झाले. Nagpur Jail
3 सप्टेंबर 2013 रोजी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला, त्या दोघांचा शोध सर्वत्र घेतला मात्र कुणाचाही पत्ता लागला नाही, पोलिसांनी आरोपींचे नातेवाईक यांच्याशी विचारपूस केली, मोबाईल क्रमांकाद्वारे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र दोन्ही आरोपींचा शोध लागला नाही.
सदर घटनेचा तपास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचेकडे सोपविण्यात आला.
सदर घटनेचा तपास पोउपनी संदीप कापडे यांनी केला व मुखबिर द्वारे माहिती घेतली असता सदर दोन्ही आरोपी नाव बदलवून आदीलाबाद जिल्ह्यातील मौजा पोनाला येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.
दोन्ही आरोपी हे telangana तेलंगणा राज्याजवळ असलेल्या कोरपना हद्दीतील पारडी या गावी येत असल्याची पक्की माहिती मिळाल्यावर कापडे यांनी सापळा रचत दोघांनाही अटक केली. Lcb chandrapur
दोघांना नाव व पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव नागेश मडावी रा . पुनाळा, ता. बेला जि.आदिलाबाद, सुनिल गेडाम रा. पुनाळा, ता. बेला जि. आदिलाबाद असे सांगीतले. त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1 ) नागो रूपी रेडलावार रा . बापट नगर , चंद्रपूर 2 ) सुनिल रमेश साखरकर रा.मोरवा असे सांगीतले. त्यावरून त्यांना ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे घेवून आले व पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पो.स्टे रामनगर व पो.स्टे . घुग्घूस यांचे स्वाधीन करण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अरवींद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली balasaheb khade बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था . गु.शा. चे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, स.फौ. राजेंद्र खनके, पो . हवा . सुरेंद्र महतो, ना.पो.शि. गणेश मोहूर्ले, पो . शि . विनोद जाधव, गणेश भोयर, दिनेश अराडे, महिला पो . शि . अपर्णा मानकर यांनी केली असुन पुढील तपास सबंधीत पो.स्टे. करीत आहे .
