प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शेतकऱ्यांच्या हक्काची आणि शेतकऱ्यांसाठी सतत झटणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या नफ्यामधून केवळ शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी प्रत्यक्ष शेतकरी त्यांचे कुटुंबीय व जनावरे यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि त्यांना हिम्मत देणे हेच CDCC बँकेचे कर्तव्य आहे. असे विचार बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी शेतकरी बांधवांना केले. यासाठीच शेतकरी कल्याण निधीची तरतूद करण्यात आली असून जमा झालेल्या शेतकरी कल्याण निधीचा उपयोग शेतकऱ्यांचे आणि त्यांचे गाई बैलं व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव वाचविण्यासाठी CDCC बँक मदत करीत आहे. मौजा आकापूर येथील शेतकरी कुटुंबियांतिल इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कु.वैष्णवी किशोर शेंडे ह्या मुलीला Brain Tumor आजार झाल्याने तिच्या उपचारासाठी लाखो रुपयांची गरज असल्याबाबतची माहिती उपसभापती संदीप कारमवार यांनी कांग्रेस नेते व CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना लक्षात आणून देताच तात्काळ बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून तीस हजार (३०,०००) रुपये तात्काळ मंजूर करून मदतिचा चेक कांग्रेसचे नेते तथा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी रुग्ण मुलगी कु.वैष्णवीला तिच्या आईच्या समक्ष दिला. तसेच मौजा टेकाडी येथील श्रीमती जिजाबाई चौधरी या महिला शेतकऱ्यांच्या बैलाला वाघाने हल्ला करुन ठार केल्याने शेतकऱ्यांना शेतकरी कल्याण निधीमधून आर्थिक मदत म्हणून १०,०००/- रुपये चेक द्वारे देण्यात आले. याप्रसंगी मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार, संचालक किशोर घडसे, शांताराम कामंडे, प्रदेश कांग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, सामाजिक कार्यकर्ते गुरु गुरनुले,शहर कांग्रेस उपाध्यक्ष कैलास चलाख, तांडाळा ग्रा.पं. उपसरपंच राहुल मुरकुटे, धनराज रामटेके,स्वागत वनकर,अभय चिटलोजवार, संदीप मोहबे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मदतीची गरज लक्षात घेऊन Chandrapur District Central Co-operative Bankही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी बँकेचे सूत्रं हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी एकमेव बँक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करुन शेतकरी व त्यांच्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याने CDCC बँकेचे कौतुक होत आहे.

