प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - भारतमातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला सत्य व अहिंसेचा महान संदेश देणारे महात्मा गांधीजी हे वंदनीय युगपुरूष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा, राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहचले. अश्या या महात्म्याला आज मुल काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते व कांग्रेस पदाधिकारी यांचे उपस्थितीत गांधीजींच्या प्रतिमेला पुष्प माला वाहून अभिवादन व प्रार्थना केली. Mahatma gandhi death anniversary
याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनूरकर,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार, संचालक शांताराम कामडे,किशोर घडसे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस ओबीसी सेलचे सरचितनिस गुरुदास चौधरी, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, गुरु गुरनुले, शहर कांग्रेस उपाध्यक्ष कैलास चलाख, संदीप मोहबे, टाडाला ग्रा.पं. उपसरपंच राहुल मुरकुटे, धनराज रामटेके, स्वागत वनकर, अभय चिटलोजवा, मोरेशवर बोलीवार,रितेश नैताम, यांचेसह ग्रामीण व शहरी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. संतोषसिंह रावत यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे कार्य व विचार कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यात गावागावात पोहचिविण्याचे काम करुन कांग्रेस संघटन मजबूत करावे असे आव्हान केले.
