प्रतिनिधी-/रमेश निषाद
बल्लारपूर - आदर्श जेष्ठ नागरिक संघ कळमना तर्फे 24 जानेवारीला काष्ठ आगार कळमना येथे 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्र सहायक कळमना जि.टी. पुरी, जोगापूर पोलीस पाटील राजेश मोरे, कळमना पोलीस पाटील बेबी नंदाताई, सौ. सविता नेव्हारे, कल्पना देशमुख, पांडुरंग उरकुडे, शशिकला बावणे, मीराबाई उरकुडे, वनरक्षक कळमना प्रताप गिरवार, प्रभाकर ठाकरे आदींची यावेळी उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. senior citizens
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख कुरेशी यांनी केले तर अहवाल वाचन पी.आर. वनकर यांनी केले.
आयोजित कार्यक्रमात आदर्श जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती.