चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इम्पॅक्ट ऑफ स्वच्छ भारत मिशन कॉम्पिटिशनचे (Impact of Swachh Bharat Mission Competition) आयोजन केले होते. यामध्ये चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान देणार्या एकूण 25 नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी बेस्ट 5 जणांना उत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य क्षेत्रातून डॉ. स्नेहल पोटदुखे, स्किल डेव्हलपमेंट एज्यूकेशन मधून नागेश नित, योगा प्रशिक्षक मधून स्मिता रेबनकर, होम कंपोस्टिंग अवरेनेससाठी सुवर्णा लोखंडे, ट्री प्लांटेशन अँड मेडिकल कॅम्पसाठी डॉ. सिराज खान यांचा समावेश आहे. swachh survekshan 2022
आयडेंटिफिकेशन अंड रेकॉग्निशन ऑफ चॅम्पियन्स या स्पर्धेत स्वच्छता कर्मचारी, वार्ड नगरसेवक, सीएसआर लीड, एन जी ओ प्रतिनिधी यांचा सहभाग होता. स्पर्धेत पाच पुरुष आणि पाच महिला गटातून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरुष गटातून प्रथम क्रमांक संतोष गर्गेललवार, द्वितीय सुभाष कासनगोटूवार, तृतीय विवेक पोतनुरणार, चतुर्थ महेंद्र राडे, आणि पाचवे जगदीश नंदुरकर यांचा समावेश आहे.
महिला गटातून प्रथम छबुताई वैरागडे, द्वितीय रोशनी तपासे, तृतीय मोनिका जैन, चतुर्थ शारदा हुसे, पाचवे बक्षीस वर्षा आत्राम यांना देण्यात येईल. स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज कॉम्पिटिशन मध्ये विविध संस्थांनी सहभाग घेतलेला होता. यामध्ये सिपेट कॉलेज तसेच उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बेस्ट 2 इनोव्हेटिव्ह मध्ये यांची निवड झालेली आहे.
