फसवणुकीचा नवा प्रकार - कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या देश व राज्यात झपाट्याने वाढत आहे, सरकारने कोरोना लसीचे दोन डोज झळलेय जेष्ठ नागरिकांसाठी बूस्टर डोज नोंदणी प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू केली.
पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी बूस्टर डोज चा लाभ घेतला मात्र आता Booster Dose लसिकरणसंदर्भात फसवणुकीचे नवे प्रकार उघडकीस येत आहे, बूस्टर डोज साठी लसीकरणं करण्यासाठी निनावी क्रमांकाने कॉल करीत बँक खात्यातील पैसे गहाळ करण्याचे काम सध्या सायबर गुन्हेगारांनी सुरू केले आहे.
Corona third wave
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सायबर गुन्हेगारांनीनी कोरोनाच्या बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक सुरू केली आहे. बुस्टर डोस मिळवण्याच्या नावाखाली या ठगांनी लोकांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. बूस्टर डोससाठी नोंदणी करण्याच्या बहाण्याने ते लोकांना कॉल करतात आणि ओटीपी क्रमांक विचारतात आणि त्याद्वारे ते तुमची बँक खाती रिकामे करतात. Cyber crimeअशा प्रकारे होते फसवणूक
कॉल येईल आणि ठग विचारेल - तुम्हाला दोन्ही लसी मिळाल्या आहेत का? तुम्ही हो म्हणाल. ठग- सर तुम्हाला बूस्टर डोस घ्यावा लागेल. मी तुमची नोंदणी करत आहे. OTP येईल, तो कळवा.
आणि नंतर हळूहळू बँक खात्यातील रक्कम गहाळ होण्यास सुरुवात होईल, म्हणून वेळेवर सतर्क व्हा व अश्या कॉल पासून स्वतः व दुसऱ्यांना सावध करा.
अश्या घटना मागील 5 दिवसापासून देशात घडलेल्या आहे..
