गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीत एका कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्याची घटना 26 जानेवरी रोजी सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास घडली.घटनेची माहिती शहरात वाऱ्या सारखी पसल्याने अनेक कामगार,सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे कार्यकर्ते,नेत्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली.कामगाराच्या नातेवाईकांनी मोबदल्यासाठी शवविच्छेदनानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह माणिकगड सिमेंट कंपनीच्या मुख्य गेट समोर आणुन ठेवला होता. अखेर ठाणेदार सत्यजित आमले यांच्या पुढाकाराने कंपनीचे प्रतिनिधी,नगरपरिषद नगराध्यक्षा सविता टेकाम व प्रमुख नेते व समाज सेवकाची बैठक पोलिस ठाण्यात घेण्यात आली त्यात मृतकाच्या कुटुंबाला साडे सात लाख रोख देण्याचे लेखी आश्वासन कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले.3 तासानंतर मृतदेह गेटसमोरून उचलण्यात आला. Manikgad cement company
आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.11 तासाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळाला.
