कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर बसस्थानक जवळ असलेल्या श्री साईकृपा मेडिकल अँन्ड जनरल स्टोअर्सचे मालक नितीन डोर्लीकर यांची पत्नी 26 नोव्हेंबर रोजी मेडिकल मध्ये असताना सायंकाळी अंदाजे 4 च्या सुमारास नजरचुकीने एका तरूणाने काऊंटरवर ठेवलेला mobile मोबाईल उचलून पोबारा केला होता. mobile thief मोबाईलचा दुरूपयोग होऊ नये या भितीने डोर्लीकर यांनी पोलीसात तक्रार दाखल केली होती. मोबाईल उचलून पसार होत असताना तरूणाचे चित्र मेडिकलच्या cctv camera सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले होते. तक्रारी नंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने शोध सुरु करून बल्लारशाह रविन्द्र नगर येथील सचीन वय वर्ष 21 या तरूणाला 5 डिसेंबर रोजी बल्लारशाह येथून अटक केली. त्याच्याकडून samsung mobile सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 14 हजार,जप्त करून कायदेशीर कारवाई केली आहे.सदर कारवाई ठाणेदार सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहफौ.सुनील बोरीकर,पोशी संदीप थेरे यांनी केली. शहरात सध्या भुरट्या चोरांचा धुमाकुळ सुरू असल्याने भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र पहायला मिळत असून यावर अंकुश लावण्यासाठी पोलीसांनी योग्य ती पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.