मूल (गुरु गुरनुले)
कार्यकाल संपण्यास काही दिवस शिल्लक असताना शेती वापरात असलेल्या शहरातील निवडक जमीनी निवासी वापरात करण्यासाठी नगर परीषद पदाधिका-यांनी आटापीटा चालविला असुन या प्रकारात लाखोची उलाढाल झाली असावी, अशी शंका नगरसेवीका ललीता फुलझेले यांनी व्यक्त केली. Land Change
प्रसिध्दीस दिलेल्या पञकातुन नगरसेवीका ललिता फुलझेले यांनी येत्या १४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. २८ डिसेंबर २०२१ रोजी विद्यमान नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्यामुळे आयोजित विशेष सर्वसाधारण सभा ही शेवटची सभा राहणार आहे. त्यामूळे आयोजित सभेत शहरातील महत्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून आर्थिक हित जोपासण्याचे दृष्टीने जोडपञ अ मधील विषयसुचीत २७ विषय नमुद करण्यात आले असुन यापैकी बहुतांश विषय जमीनीच्या वापरात फेरबदल करण्या संदर्भातील असल्याचे नमुद केले आहे. मूल शहरात अनेक ले आऊट मंजुर असुन फक्त खरेदी विक्रीचे व्यवहार तेवढे होत आहेत. तांञीक बाबी समोर करून घर बांधकामास परवानगी नाकारल्या जात आहे. त्यामूळे अनेक ठिकाणी विना परवानगी घर बांधकाम सुरू असुन अनेक ले आऊट मधील भुखंड बांधकामाविना मोकळे पडुन आहेत. मोकळ्या पडलेल्या अनेक भुखंडावर झुडपे वाढली असुन आजुबाजुच्या घरातील पाणी साचल्या जात आहे. त्यामूळे त्यापरीसरात मच्छरांचा प्रादुर्भाव आणि डुकरांचा हैदोस वाढला असुन दुर्गंधी पसरली आहे, पसरलेली दुर्गंधी आणि झुडप तोडुन स्वच्छता ठेवण्यासाठी नगर प्रशासन दरवर्षी लाखो रूपये खर्च करीत आहे. असे असताना शहरातील निवडक शेतजमीनी निवासी वापरा करीता आरक्षित करण्याचा उद्देश काय असावा ? असा प्रश्न ललिता फुलझेले यांनी विचारला आहे. शहरालगत असलेल्या शेतीला पाणी जाणारी निस्तार हक्काची जमीन असुन हे प्रकरण जिल्हाधिकारी यांचे कडे न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणांची नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांना माहीत असतांना याकडे दुर्लक्ष करून पाच वर्षाच्या कालावधीत एकदाही जमीन वापराच्या फेरबदलाचे विषय चर्चेला न घेता कार्यकाल संपण्यास मोजके दिवस शिल्लक असताना परवानगी देण्यासाठी पुढील कार्यवाही करणे सोईचे व्हावे म्हणुन ठराव घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजीत करणे. हा प्रकार संशयास्पद असुन यामुळे काय साध्य होणार आहे ? असा प्रश्न करत नगरसेवीका ललिता फुलझेले यांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.
१४ डिसेंबर रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत मूल शहरातील सर्व्हे नंबर ४३३, ४३४, ४३५, ७९०/१, ७९१/१, ७९३/३, ७९३/४ आणि ७९३/५, रामपुर तुकुम येथील सर्व्हे नंबर ७३/१ आणि ७३/२ आणि गोंडी विहीरगांव येथील सर्व्हे नंबर ५ मधील एकुण १२.१४ हे.आर. शेत जमीन निवासी वापरामध्ये समाविष्ट करण्याचे विषय चर्चेला घेणार आहे. सदर जमीनी मोजक्या मंडळीच्या मालकीच्या असुन सदर जमीनीचा वापरात बदल झाल्यास जमीन मालकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होणार आहे. त्यामूळे जमीन मालकांचा आर्थिक लाभ जोपासतांना आपलाही आर्थिक लाभ व्हावा. या एकमाञ उद्देशाने कार्यकाल संपण्याचा शेवटच्या काळात सदर विषय चर्चेला घेण्यात आल्याने आता नगरसेवकांच्याही आशा प्रफुल्लीत झाल्या आहेत. १७ सदस्यीय मूल नगर परीषदेत १५ सदस्य भाजपाचे असल्याने जमीन वापर फेरबदलाचा ठराव बहुमताने पारीत होणार यात शंका नाही. विकासाच्या नांवाखाली घेतल्या जाणारा सदर ठराव शेवटच्या काळात घेण्याऐवजी पाच वर्षाच्या कार्यकाळात कां घेतला नाही ? असा प्रश्न विचारतांना सदर प्रकरणाला अर्थकारणाचा वास येत असल्याने सदर प्रकरणी न्यायालयात दाद मागु. असा इशारा ललिता फुलझेले यांनी दिला आहे. Mul munciple corporation
