चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सुगंधित तंबाखू, कोल व वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे, मात्र आता या धंद्याला Online लॉटरी ची साथ मिळाली असून सध्या हा अवैध धंदा 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाला.
राज्यात सध्या फक्त पेपर लॉटरी सुरू आहे, मात्र दुकानाबाहेर पेपर लॉटरीचे बोर्ड लावून आत ऑनलाइन लॉटरी चा अवैध बाजार सुरू आहे. Illegal
याआधी news34 ने या अवैध धंद्याची पडताळणी करीत संपूर्ण रॅकेट समोर आणले, पोलीस कारवाई होणार या धास्तीने सदर दुकाने बंद करण्यात आली.
बातमी का लावली यासाठी News34 च्या संपादकाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.
मात्र आता 2 महिन्यांनी पुन्हा ही दुकाने सुरू झाल्याने या धंद्याला पाठबळ कुणाचं यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Online lottery
सदर धंदा हा जिल्ह्यासह चंद्रपूर शहरातही मोठ्या प्रमाणात सुरू आहे, 10 रुपये ते 10 हजारांचा आकडा ग्राहकाने लावल्यास त्याला लहान रक्कम मिळते मात्र मोठी रक्कम या ऑनलाइन लॉटरी मध्ये लावल्यास एकही आकडा लागत नाही, हीच सेटिंग अनेक वर्षांपासून चंद्रपुरात सुरू आहे.
सट्टा, जुगार व ऑनलाइन लॉटरी यामध्ये काही फरक नसून दोन्ही खेळ सारखेच, मात्र पोलीस प्रशासन यावर कारवाई का करीत नाही हे तरी सध्या न समजण्यासारखे कोडे आहे.
