कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर.काळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय कला प्रमुख प्रा.जहीर एस.सैय्यद, व्यवसाय प्रमुख प्रा.पि.एम.वांढरे,विज्ञान विभाग प्रमुख कु.एस.एम.ताकसांडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या वतीने कु.स्नेहा कोटनाके ह्या विद्यार्थींनीने आपले मनोगत व्यक्त केले.अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन प्राचार्या काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांना केले. संचालन प्रा.पि.टी.खैरे तर आभार प्रा.ए.पि. मेहरकुरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला विज्ञान व व्यवसाय सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.
