चंद्रपूर - आजकाल आयुष्यात संकट आलं की रक्ताचे नाते ही कामी येत नाही पण कुठलेही नाते नसणारे हे नक्कीच कामी येतात याचं जिवंत उदाहरण चंद्रपुरातील 3 युवकांनी समाजासमोर दिले आहे.
शहरातील शामनगर भगत सिंग चौकात राहणाऱ्या शिखा पांजा या महिलेला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दाखल करण्यात आलं होतं.
शिखाचं रक्त हे दुर्मिळ म्हणजेच O निगेटिव्ह असल्याने तिला 3 बॉटल रक्ताची आवश्यकता भासली, मात्र आपण चंद्रपुरातील निवासी व रक्ताची गरज दुसऱ्या जिल्ह्यात, शिखांच्या कुटुंबीयांनी न खचता चंद्रपुरातील रिंकू कुमरे यांच्याशी संपर्क साधला.
वेळेवर रक्ताची गरज ती सुद्धा दुर्मिळ Rare गटाची असल्याने रिंकू यांनी चंद्रपुरातील O निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या 3 युवकांना सम्पर्क साधत सदर बाब सांगितली, तिघांनी रक्त द्यायला होकार दर्शविला व लगेच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे युवकांनी दाखल होत रक्तदान केले.
पंकज पचारे, वरून यादव व आकाश सरकार या दुर्मिळ रक्तगट असणाऱ्यां युवकांनी समाजासमोर आदर्श ठेवत आपलं सामाजिक दायित्व पार पाडले.