चंद्रपूर - जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा अभयारण्यात जगातून पर्यटक वाघ बघण्यासाठी येत असतात, कोरोनाच्या काळात तब्बल 2 वर्षे ताडोबाचे दार पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले, सुट्टीच्या दिवशी ताडोब्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहे.
ऑनलाइन संकेतस्थळावरून सफारी बुकिंग करून पर्यटक ताडोब्यात दाखल होत आहे, असेच एक कांबळे कुटुंबीय मुंबईतून 19 डिसेंम्बरला ताडोब्यात सफारीसाठी दाखल झाले. Insulting tourists
6 सदस्यीय कांबळे कुटुंबीयांनी सायंकाळची सफारी बुक केली होती, त्यांच्यासमवेत 1 वर्षीय लहान बाळ होत मात्र वेळेवर त्याला दूध उपलब्ध न झाल्याने बाहेरून दूध खरेदी करण्यात आले मात्र हे सर्व करताना त्यांनी 7 मिनिटांचा वेळ झाला.
मोहूर्ली गेटजवळ पोहचताच मोहूर्ली गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला, विशेष म्हणजे त्यांचं वाहन हे मोहूर्ली गेटच्या आत होते.
आम्हाला प्रवेश का नाकारला असे विचारताच गेटवरील कर्मचाऱ्यांनी कांबळे कुटुंबियांसमवेत अरेरावीची भाषा केली. Tadoba safari
त्यांची सफारी बुकिंग दुसऱ्याला देण्यात आली, रविवारी स्पॉट बुकिंग कुणाला देण्यात येत नाही, मात्र 19 डिसेंम्बरला कर्मचाऱ्यांनी नियमभंग केला.
कांबळे कुटुंबीयांनी पैसे परत मागितले असता तुमचे पैसे परत मिळणार नाही ज्याला तक्रार करायची असेल खुशाल करा असा दम कांबळे कुटुंबियांना दिला.
मुंबई सारख्या मोठ्या शहरातून सुट्टीचा दिवस कुटुंबासाठी काढत ते ताडोब्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले मात्र ताडोब्यात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आनंदावर विरजण टाकले. National park tadoba
कांबळे कुटुंबीयांनी मोहूर्ली येथील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून असा प्रसंग दुसऱ्या कुणावर ओढवू नये.
