कोरपना ताप्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथे संताजी महिला मंडळाच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाजांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दिप प्रज्वलन करून उपस्थितांना यांच्या जीवनाबद्दल प्रबोधन करण्यात आले. यानिमित्ताने Santaji Jagnade संताजी महिला मंडळातर्फे obc reservation ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याबाबत शासनाकडे मागणी करण्याचे ठरविण्यात आले.सदर कार्यक्रमात सौ. मोना कलोडे, सौ.संगीता वैरागडे,सौ.हेमलता येरणे, सौ.प्रतिभा वैरागडे, सौ.प्रीती पोटदुखे,सौ.मनीषा बुटले,सौ.वर्षा बेले,सौ.शुभांगी मंगरूळकर,सौ.रेश्मा येरणे,सौ.किरण गिरीपुंजे यांच्यासह तेली समाज भगिनी उपस्थित होत्या.
