प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर आणि श्री तरुण उत्साही क्रिडा व बहुउद्देशीय मंडळ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी सामने व जूनियर निवड चाचणी दिनांक १३/१२/२०२१ रोज सोमवारला श्री तरुण उत्साही क्रिडा मंडळच्या पटांगणावर, शिवाजी वॉर्ड बल्लारपूर येथे आयोजित उद्घाटन समारंभास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन चंदनसिंह चंदेल, माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर शहराचे प्रथम नागरिक हरीश शर्मा व उमेश पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपुर भाजपा शहराध्यक्ष काशिनाथ सिंह, सौ.सुवर्णा भटारकर नगरसेविका शिवाजी वॉर्ड, बिरेंद्र श्रीवास श्रीराम सेना महासंघ अध्यक्ष बल्लारपूर, श्रीराम बालक आखाडा चे वस्ताद कबड्डी चे राष्ट्रीय खेळाडू भास्करभाऊ पेंदोर, भाजपा शहर सचिव इंजि.देवेंद्र वाटकर, अरुण भटारकर, गुलाब यादव, आशिष चावडा उपस्थित होते. या प्रसंगी चंदनसिंह चंदेल यांनी खेळ हा मानवीय जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मानवीय शरीर चुस्त आणि स्पूर्तिदायक राहण्याकरिता प्रत्येकाने खेळासोबत आजीवन सलग्न असले पाहिजे.त्यात कबड्डी हा तर आपला पारंपारिक खेळ आहे ज्याची मजा जेवढी खेळणाऱ्याला येते त्यापेक्षा दुप्पट पाहणाऱ्याला येते. आजच्या युवा पिढी ने आपल्या जीवनात कोणत्याही व्यसनी न जाता आपल्या शरीराला तसेच आपल्या मनाला मानसिक स्वस्थ ठेवण्याचा उत्तम प्रकार म्हणजे खेळ आहे असे मत व्यक्त केले. Kabbadi tournament
या प्रसंगी त्यांनी आयोजकांचे देखील सुंदर नियोजन करून तरुण वर्गाला एक सकारात्मक प्रयत्न केल्याबद्दल व भविष्यात असेच प्रयत्न या श्री तरुण उत्साही क्रिडा मंडळ बल्लारपूर च्या वतीने चालू राहण्याकरीता शुभेच्छा दिल्या.
