चंद्रपूर - "झूकेगा वही जिसमे जान है, अकड तो मुरदेकी खास पहचान है" सदर वाक्याचा हिरमोड करून मुर्दा या शब्दाच्या जागी मोदी अस छापण्यात आलं, तेसुद्धा महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात, वर्तमानपत्रात अशी अक्षम्य चूक जाणून झाली असेल का याचा मात्र शोध घेण्याची गरज आहे.
हे वाक्य राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एसटी संपाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले मात्र बातमीची लगीनघाई मध्ये सदर वृत्तपत्राने वाक्याचा हिरमोड करीत सर्व बातमीच्या अर्थाचा अनर्थ केला. Sudhir mungantiwar
एसटी संपाबाबत मुनगंटीवार यांनी राज्यसरकार वर टीका केली, सध्या एसटी कामगार करो या मरो च्या भूमिकेत आला आहे, सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कामगारांना वेतन देऊ असे मुद्रित केले होते, मात्र त्यांनी आता आपल्या जाहिरनाम्याचा शब्द विसरले, कामगारांवर अन्याय होता कामा नये. Modi
सदर प्रतिक्रियेत मुनगंटीवार यांची जीभ घसरली व चक्क मोदींवर टीका करीत भाजपला घरचा आहेर दिला अशी बातमी नामांकित वर्तमानपत्रात आल्याने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. St bus strike
याबाबत आमदार मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सम्पर्क झाला नाही.

