चंद्रपूर - देशात ओमायक्रोन Omicron variant या नव्या विषाणूचा प्रसार वेगात होत असल्याने सरकार निर्बंध लावीत आहे, एकीकडे व्हायरस चा प्रसार तर दुसरीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज नागरिक, यामुळे या विषाणूचा प्रसार होऊ शकतो हे लक्षात घेत राज्य शासनाने काही प्रमाणात निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. New year evening rule
चंद्रपूर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.
Chandrapur police
३१ डिसेंबर २०२१ ( वर्ष अखेर ) व नुतन वर्ष २०२२ ला मोठया प्रमाणात एकत्र न येता किंवा प्रशासनाने लागु केलेल्या कलम १४४ सीआरपीसी, अन्वये ५ किंवा ५ पेक्षा अधिक इसम एकत्र न येता नविन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षीत आहे. उपरोक्त प्रमाणे नववर्ष निमित्त पोलीस विभागामार्फत चंद्रपूर शहरात एकुण २३ ठिकाणी फिक्स पॉईट, १५ ठिकाणी नाकाबंदी व १७ ठिकाणी चारचाकी, दुचाकी तसेच पायदळ पेट्रोलींग पॉईट लावण्यात आले आहे. वाहतुक शाखेमार्फत अतिरिक्त एकुण १४ ठिकाणी फिक्स पॉईट व पेट्रोलींग पॉईट लावण्यात आले असुन एकुण ३२ अधिकारी व २७० पोलीस अंमलदार बंदोबस्तकरीता रस्त्यावर राहणार आहेत. बंदोबस्त दरम्यान कोणीही दारू पिऊन वाहन चालवितांना मिळुन आल्यास Drunk and Drive ची कार्यवाही तसेच नियमाचे उल्लंघन करून उपद्रव माजवुन मिळवुन आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्व नागरीकांना आवाहन आहे की , त्यांनी नुतन वर्ष अत्यंत साधेपणाने व स्वत : च्या घरीच साजरा करावा.