चंद्रपूर - वाघांचा जिल्हा म्हणून चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यचं नाव आहे, ताडोबा अभयारण्य येथे वाघांची संख्या राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहे, या अभयारण्यात जगभरातून पर्यटक येत असतात.
मात्र काही दिवसांपासून ताडोब्यात "मानवी पिशाच" सारखा दिसणारा प्राणी आला आहे, ताडोब्यात फिरायला जाऊ नका" असा संदेश सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. human vampire
जगभरात कुठे लहान घटना जरी घडली तर ती अवघ्या काही सेकंदात आपल्या मोबाईलद्वारे कळते, याचा उपयोग चांगलाही आहे मात्र काही नागरिक समाजमाध्यमाद्वारे अपप्रचार पसरविण्याचे काम करीत आहे. Tadoba national park
ताडोब्यात मानवांना खाणारा पिशाच आला हा एकप्रकारचा अपप्रचार आहे.
पर्यटकांनी कसलीही भीती बाळगू नये, असे वनविभागाद्वारे कळविण्यात येत आहे.
लहान मुले व मानवांवर हल्ला करणाऱ्या मानवं आकाराचा कोल्हा सदृश्य प्राण्यांचा हा व्हिडीओ Hollywod movie मधील असल्याचे जाणकारांचे मत आहे, व त्या व्हिडीओ त असलेले काही चित्र हे उत्तरप्रदेश किंवा दक्षिण भारतातील असल्याचे दिसत आहे.
अश्या कोणत्याही व्हिडिओ वर विश्वास करू नका, ताडोबा पर्यटकांसाठी नेहमी सुरक्षित ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
