कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा व सत्तारूढ नगरसेवकांना जनतेनी शहराचा विकास व जनतेला लागणाऱ्या चांगल्या सुविधांसाठी निवडून दिले.परंतु मागील काही महिन्यांपासून हे शहरा बाहेरील जनतेनी बंद केलेली दारू दुकाने येथे आणुन येथील जनतेला अजून जास्त दारूडे बनवून,कुटुंब कलह निर्माण करून कुटुंब उध्वस्त करण्याचा व शहराचे सामाजिक स्वास्थ्य खराब करण्याचा प्रयत्न करताना लक्षात येत आहे. शहराला liquer hub दारूचा हब बनविण्याचा प्रयत्न होत असून येथील जनतेला दारूडी जनता म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.असे आरोप गडचांदूर येथील प्रतिष्ठित नागरिक रमाकांत कोमावार यांनी त्यांच्या निवासस्थाना जवळ येणाऱ्या नवीन स्थलांतरित दारू दुकानाच्या विरोधात नगरपरिषद सत्ताधाऱ्यांवर निवेदनातून केले आहे. Liquer store
याविषयी सविस्तर असे की,येथील वार्ड नं.5, प्रभाग क्रं.3 मध्ये रमाकांत कोमावार यांच्या निवासस्थान व रिकाम्या जागे जवळ(भविष्यात होणारे व्यापार व निवासी संकुल)तसेच अतिशय वर्दळीच्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या मूख्यद्वार चौकात असलेल्या श्रीमती सुमनबाई बाबुराव कोटावार यांच्या इमारतीत जयस्वाल वाईन मार्ट किरकोळ देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी न.प. चे लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचा विषय 9 डिसेंबर(आज) रोजी होणार्या सर्वसाधारण सभेच्या विषयसुचीत 14 क्रमांकावर नमूद करण्यात आलेला आहे.यावर सभेत विचार विनिमय करून निर्णय घेतला जाणार असल्याचे कळते.मात्र या देशी दारूच्या दुकानाला सुरेंद्र कोमावार यांनी तीव्र विरोध दर्शवून यांनी यामगचे कारणही निवेदनात नमूद केले आहे.जर याठिकाणी दारू दुकान सुरू झाले तर यांना व्यक्तीगत नुकसान व त्रास तर होणारच आहे सोबतच स्थानिक नागरिकांचा सुद्धा मनस्ताप वाढणार आहे.कारण श्रीमती कोटावार यांच्या इमारतीच्या आजुबाजुला निवासी क्षेत्र असून येथील प्रत्येक कुटुंबातील मुले शिक्षण घेत असल्याने भविष्यात दारूच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तसेच या इमारतीच्या बाजूलाच शासन मान्य गरीब व निराधार मुला मुलींचे वसतीगृह आहे.यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो असे एकना अनेक कारण असल्याने कोमावार यांनी भविष्यात याठिकाणी होणार्या देशी दारूच्या दुकानाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
अगोदरच शहरात जवळपास 12 विदेशी,5 देशी दारूची दुकाने व Beer shopee बीअर शॉपी आहे. काही दारू दुकानाला अजूनही जनतेचा विरोध सुरू आहे.असे असताना पुन्हा एक देशी दारू दुकान आणण्याचा प्रयत्न येथील काही गर्भश्रीमंतांकडून सुरू असल्याचे आरोप करत या दारू दुकानाला तीव्र विरोध कोमावार यांनी दर्शविला आहे.न.प.मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, सत्ताधारी सभापती,गटनेता व नगरसेवक यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्य उत्पादन शुल्क मंत्री,क्षेत्राचे खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा उत्पादन शुल्क तसेच श्रीमती सुमनबाई कोटावार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.याच बरोबर स्थानिक प्रभागातील नागरिकांनी सुद्धा याचा विरोध करत स्वाक्षऱ्यांचे निवेदन नगरपरिषदेला दिले आहे.याच पार्श्वभूमीवर काही महिन्यापूर्वी अशाच एका स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत दिल्याने नगरपरिषदेची मोठ्याप्रमाणात किरकिरी झाली आणि आता पुन्हा एक नवीन दारू दुकानाचा विषय समोर आल्याने पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
