प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्ह्यातील मुल-सावली-सिंदेवाही तालुक्यात आकस्मिक आलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दारी प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नाम.दादाजी भुसे आणि ओबीसी कल्याण व मदत पुनर्वसन मंत्री नाम.विजय वडेट्टीवार,सोबत जिल्हाधिकारी गुलहाने साहेब यांनी जिल्ह्याचा दौरा केला. आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन पाहणी केली नुकसान ग्रस्त शेतकरी यांचेशी संवाद साधून चर्चा केली आलेली संकटकाळीं परिस्थिती समजून घेतली आपण खचून जाऊ नये अशा शब्दात शेतकऱ्यांना धीर दिला. याच दिवशी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी योजने अंतर्गत कँसर,हार्ट, दुर्धर आजार, आणि शेतकऱ्यांना विंचू, साप चावून ,वीज पडून मेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत, धानाचे पुंजने जळालेल्या शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत देणारी सहकारी बँक मी पहिल्यांदाच बघत आहे. आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तसेच वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना व वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू पावलेल्या जनावरांच्या मोबदल्यात आर्थिक मदतीचा हात धनादेशद्वारे माझ्याच हस्ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिला.अशी मदत देणारी महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एकमेव पहिली बँक असल्याची प्रशंसा करुन बँकेचे चेअरमन संतोषसिंह रावत यांचे महाविकास आघाडी शासनाच्या वतीने जाहीर अभिनंदन केले व शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री या नात्याने त्यांना धन्यवाद देत राज्यातील इतरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी चंद्रपूर जिल्हा शेतकरी कल्याण निधी योजना पॅटर्न राबवावा असे आव्हान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केले. याप्रसंगी पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांनीही बँकेनी राबवित असलेल्या धोरणात्मक निर्णयाचे स्वागत केले. Cdcc Bank chandrapur चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चिमढा, टेकाडी, येथील वाघाच्या हल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नाम.कृषीमंत्री दादाजी भुसे व पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून असंख्य शेतकरी बांधवासमोर दोन्ही वारसदारांना आर्थिक मदतीचा चेक दिला याबद्दल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संतोषसिंह रावत यांनी कृषीमंत्री नाम.दादाजी भुसे व मदत पुनर्वसन मंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांचे बँकेच्या वतीने जाहीर आभार मानले आहे.
