चंद्रपूर - नेता म्हटलं की डोळ्यासमोर आश्वासनांचा पाऊस पडतो, नेते राजकारण वाढीसाठी नागरिकांना आश्वासन देत भुरळ पाडतात मात्र चंद्रपुरातील या नेत्याने आश्वासन न देता अनोळखी युवकांच्या मदतीला धावून गेला, विशेष म्हणजे अडचणीत सापडलेल्या युवकांनी अनेक जनप्रतिनिधी सोबत संपर्क साधला पण कुणीही प्रतिसाद दिला नाही.
मात्र अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी मदतीचा हात देत त्यांची अडचण समजून घेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
आरोग्यविभागाच्या ड वर्गाच्या परीक्षा रविवारी घेण्यात आल्या, परंतु राज्य शासनाच्या घोळात व एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात परीक्षार्थी भरडले गेले आहे. आधीच विविध वादात सापडलेल्या भरतीमुळे विद्यार्थ्यांचे राज्यभर हाल झाले. अश्यातच राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने राज्यभर आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी बसेस नसल्याने परिक्षार्थींसमोर अडचणी निर्माण झाल्या.
Mns adhikrut
साडे चार वाजता परीक्षा संपल्या नंतर सायंकाळी जवळपास ३०० ते ४०० विद्यार्थी चंद्रपूर बसस्थानकावर परळी, नांदेड, आदीलाबाद, यवतमाळ येथून आलेल्या विद्यार्थ्यांची अचानक गर्दी झाली.
त्यातील काही विद्यार्थ्यांनी स्वतःची खाजगी बसेस ने गावाला जाण्याची व्यवस्था केली, परंतु दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांची व्यवस्था न झाल्याने ते रात्री दहा पर्यंत बस्थानाकावर ताटकळत बसेल.
अश्यातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांना परीक्षार्थी बसस्थानकावर अडकले असल्याची माहिती मिळताच परिक्षारथ्यांची भेट घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयाच्या विविध संघटना, मंत्री, आमदार, खासदार, आरटीओ, व जिल्हाधिकार्यांना मदतीची आव्हान केले परंतु जेवणाची व गावी जाण्याची कोणतीही मदत करू शकले नाही त्या विद्यार्थ्यांना मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह यांनी स्वखर्चाने परिक्षार्थ्यांची रात्रीच जेवणाची व्यवस्था करून पहाटे ३ वाजता बसची व्यवस्था केली व यवतमाळ परंतु सोडण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. सर्व उपास्थित परिक्षार्थींनि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहजाद सय्यद, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्राम.पं. सदस्य नितीन टेकाम, करण नायर,अनिल राम, रोहित घोरपडे, तुषार येरमे,भीम यादव उपस्थित होते.

