चंद्रपूर - चंद्रपुरात मागील अनेक दिवसांपासून गोर-गरीब जनतेची सेवा व शहरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम समाजसेवी भूषण फुसे करीत आहे, शहरातील खड्ड्यांविरोधात आंदोलन असो की तृतीयपंथी यांच्या हक्कासाठी लढणारे फुसे यांनी आता स्वतःचा राजकीय मार्ग निवडत सर्वाना धक्का दिला आहे, आगामी चंद्रपूर मनपा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना घाम फोडण्यासाठी भूषण फुसे सज्ज झाले आहे.
चंद्रपूर जिल्हात गोर- गरिब पीड़ितासाठी रात्र-दिवस काम करीत असलेले भूषण फूसे यांनी श्रद्धेय आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व त्यांनी प्रत्येक समाजातील घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी संपूर्ण भारतभर चालवलेली चळवळ पाहता फूसे साहेब यांनी बाळासाहेब आंबेडकर याचे हात बळकट करण्याच्या हेतूने आज दि.01/11/2021 ला पक्ष कार्यालय मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला.
त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर ह्यांची भेट घेतली. साहेबांनी श्री भूषण फुसेजी ह्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

