प्रतिनिधी/रमेश निषाद
विसापूर :- आपली लोकशाही प्रगल्भ आहे. Democracy लोकशाही प्रक्रियेत Election मतदान महत्वाचे आहे. यासाठी मतदार नोंदणी केली जाते. सर्वसामान्य मतदारांना आपला प्रतिनिधी निवडताना व मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक विभाग कार्यरत आहे. अध्यावत मतदार यादी तयार करण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून प्रारूप मतदारापुढे ठेवली जात आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदान नोंदणी महत्वाची आहे, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी विसापूर येथे केले. Voter Registration
विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्थानिक मुनी समाज सभागृह येथे विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून प्रारूप मतदार यादीचे वाचन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी, तहसीलदार संजय राईंचवार, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ. सुधीर मेश्राम, मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे, तलाठी रोहितसिंग चौव्हान यांची उपस्थिती होती.
यावेळी मतदान केंद्र स्तरीय बीएलओ संतोष निपुंगे, कल्पना मिलमिले, उषा पुणेकर,मंजुषा बावणे, मीनाक्षी मिलमिले,तारामती जीवने, नंदकिशोर वडस्कर, राजू पुणेकर, सरोज चांदेकर,यांनी मृत मतदार, स्थलांतरीत व जानेवारी २०२२ रोजी ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली, अशांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असेही ग्रामसभेत सांगण्यात आले.
बॉक्स
कोरोना लसीकरण सर्वांनी करून घ्यावे - संजय राईचंवार
कोरोना प्रादुर्भावाची Corona Wave सर्वांनी मोठी झळ सोसली आहे. कोरोना संक्रमन काळ संपला म्हणून गाफिल राहू नका. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनी आपणास चांगला धडा दिला आहे. संसर्ग थांबविण्यासाठी कोरोना मुक्त गाव होणे, गरजेचे आहे. १८ वर्षावरील सर्वांनी कोरोनाची लस Covid Vaccine घेणे, आवश्यक आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असून निरामय आरोग्यासाठी सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी. गावाला कोरोनामुक्त करण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आव्हान बल्लारपूर येथील तहसीलदार संजय राईचंवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, शशिकला जीवने, विद्या देवाळकर, सुनील रोंगे, सरोज केकती, गजानन पाटणकर, दिलदार जयकर यांच्यासह गावाकऱ्यांची उपस्थिती होती.