प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - 'आजादी का अमृत महोत्सव ' या कार्यक्रमाचे अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती, बल्लारपूर व तालुका बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात घेण्यात आली. Azadi Ka Amrut Mahotsav
१४ नोव्हेंबरला बक्षिस वितरण श्रीमती व्ही.व्ही.चौधरी दिवाणी न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आले त्यात मो.जव्हेरी कन्या विद्यालयातील कु. अफरीन शेख वर्ग ८ वा दुसरा क्रमांक व सना खान, अंजली खेडेकर,फिजा सय्यद, वैष्णवी केशकर,खुशी केशकर,पायल बहुरीया यांनाही विशेष बक्षिस देण्यात आले.सर्व विद्यार्थिनींचे शाळेच्या प्राचार्या सौ कोतकेलवार, उपमुख्याध्यापक सौ.ढेंगळे पर्यावेक्षिका रच्चावार कु. विमल पून ,सर्व शिक्षिका व इतर कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांनींचे अभिनंदन केले.