राजुरा : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु असून ज्यांचे मतदार यादीत नाव नाही अश्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी राजुरा तहसिल कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी जनजागृती सायकल रॅली शहरातून काढण्यात आली.
Voter Registration
मतदार नाव नोंदणी मोहीम दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण होत आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अश्या नागरिकांनी या मोहिमेत आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. 70- राजुरा विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या कार्यक्रमानुसार 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचे नाव समाविष्ट करणे, ज्याची नावे मतदार यादीत नाही अश्यांची मतदार नाव नमुना ६ चे अर्ज भरून नवीन मतदार नोंदणी करणे, तसेच मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करणे हा कार्यक्रम ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार असून नाव नोंदणीसाठी स्थानिक क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांचेमार्फत अर्ज भरता येवू शकणार असल्याचे रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
Cycle rally
या सायकल रॅलीला उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले, मंडळ अधिकारी सुभाष साळवे, निरंजन गोरे, अन्न पुरवठा निरीक्षक विकास राजपूत, तलाठी मारोती अत्रे, गेडाम, चिडे, नगर परिषदेचे कर्मचारी, तालुक्यातील महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायकल रॅली शहरातील बाजारपेठ व मुख्य मार्गाने काढण्यात आली.