प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - तालुक्यातील मौज चिखली येथे दरवर्षी जय हनुमान क्रीडा मंडळ यांचे वतीने कबड्डी सामन्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, यावर्षी सुद्धा दिनांक ६नोव्हेंबर ते ९नोव्हेंबर दरम्यान कबड्डी क्रिडा स्पर्धा पार पडली. ज्यामधे कबड्डी क्रीडा स्पर्धेत एकूण ४५ संघानी यात सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उदघाटन युवक नेतृत्व प्रभाकर भोयर यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी उपायुक्त श्री. किरण गावतुरे व उपसरपंच प्रा. दुर्वास कडस्कर यांनी दीपप्रज्वलन केले. कुठल्याहीप्रत्येक सामन्यांमध्ये खेळाडूत चुरस, क्षमता, कमालीची असते ती बघायला मिळाली.आणि यातच अंतिम सामना शिवणीसंघ विरूद्ध कोळसा संघ रंगतदार झाला.अंतिम बाजी शिवणी संघाने मारत प्रथम क्रमांक पटकाविला तर कोळसा संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ ला सायंकाळी १०:०० वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ झाला. बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष गावचे उपसरपंच दुर्वास कडसकर, उपाध्यक्ष उमाजी मंडलवार, प्रमुख अतिथी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बबन कडस्कर,ग्राम पंचायत सदस्य राकेश जोलमवार, चंदाताई कडस्कर, व गावातील प्रतिष्ठीत नागरिक, माजी सरपंच, सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना प्रा. दुर्वास कडस्कर यांनी आपले क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो स्पर्धकांमध्ये जिद्द चिकाटी कायम असावी, ज्यांनी परिपूर्ण परिश्रम घेतला त्यांना यश संपादन करणे अवघड नाही. यश निश्चितच त्याच्या पदरी पडत असते. पण अपयशाने खचून न जाता पुन्हा आत्मविश्वासाने प्रयत्न करा समोर नक्कीच तुमचाच विजय आहे.असे मार्गदर्शन आपल्या भाषणातून यांनी केले.
स्पर्धेचे प्रथम बक्षीस १५ हजार ,द्वितीय बक्षीस ११ हजार,तृतीय बक्षीस ७ हजार ठेवण्यात आले होते. याशिवाय सर्वोत्कृष्ठ आलराउंडर, सर्वोत्कृष्ट रेडर, सर्वोत्कृष्ट डिपेंडर म्हणून देण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील नवघडे, उपाध्यक्ष गौरव कडस्कर, सचिव सुरज चुदरी,प्रज्वल कडस्कर, क्रीडा प्रमुख पवन आभारे, ग्राउंड मॅनेजर अंकुश गेडाम,अनुप काकडे, कोषाध्यक्ष सचिन झरकर,आदित्य चुदरी यांचेसह सर्व पदाधिकारी, सदस्य, आणि गावातील क्रीडाप्रेमी युवक व नागरिक यांचेही परिश्रम व सहकार्य लाभले असून गावातील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
