भद्रावती : वरोरा तालुक्यात 2 दिवसआधी वाघ शिकारीच्या शोधत असताना विहिरीत पडला होता, मात्र अथक प्रयत्नांनी तो वाघ बाहेर निघाला.
2 दिवसांनी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा-वायगाव रोडवरील एका शेतात वाघिणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. Female tiger
सदर मृतक वाघीण ही अंदाजे 3 वर्षाची आहे, शेतातील लावलेल्या कुंपणात करंटला वाघिणीचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्यात त्या वाघिणीचा मृत्युं झाला असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.
पुढील तपास वनवीभागाची चमू करीत आहे.
