चंद्रपूर: चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २७) व रविवारी (दि.२८) नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ या काळात सुरु ठेवण्यात येणार आहे. Msedcl
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी सुरु राहणार आहेत. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अँप किंवा इतर online 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी थकीत व चालू वीज
बिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
बिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
