जिवती - चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका घोषित झाल्याने उमेदवारांची विविध पक्षात चाचपणी सुरू आहे.
निवडणुकीची लगबग बघता अनेक आजी माजी नगरसेवक आपला पक्ष सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहे. Shivsena
जिवती नगर पंचायत चे कांग्रेसचे नगरसेवक वसंत नारायण राठोड यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला.
आगामी जिवती नगर पंचायत निवडणुकी संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात जिवती येथे बैठक घेउन निवडणुकी संबंधीत उमेदवार यांच्या सोबत संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मण उर्फ भुरू मुंडे, शिवसेना तालुका समन्वयक बळीराम शेळके, पंढरी मस्कले पाटील माजी जी. प. सभापती, रमेश राठोड शहर अध्यक्ष जिवती शहर, राहुल विरुटकर, युवासेना उप जिल्हा प्रमुख प्रणित अहिरकर, मारोती गायकवाड, प्रशांत राठोड युवासेना शहर अध्यक्ष जिवती शहर आणि इत्तर पदाधिकारी उपस्थित होते. Congress corporater
