प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - लोकवस्ती मध्यें सुरू असलेल्या भंगार दुकानाचा नागरीकांना नाहक त्रास होत असून अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. त्यामूळे लोकवस्ती मध्यें सुरू असलेला भंगार व्यवसाय बंद करावा. अन्यथा Fast unto death प्राणांतीक उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशारा दिला आहे.
नगर परिषद हद्दीमधील वार्ड क्र १० मध्यें अब्दुल गफार शेख आणि त्यांची मूले मागील तीन वर्षापासून भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सुरू असलेला सदर व्यवसाय हा लोकवस्तीमध्यें असल्याने या व्यवसायापासून परिसरातील नागरीक मोठया प्रमाणांत त्रस्त आहेत. चोरटे आणि दारूडे व्यक्ती भंगार विकण्याकरीता शेख यांचे दुकानात ये जा करत असतात, त्यांचे बोलण्यात नेहमी असभ्य आणि अर्वाच्च भाषेचा वापर होत असल्याने शेख यांच्या दुकानाला लागुन असलेल्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत असून याचा त्यांच्या लहान मुलांवर विपरीत परिणाम पडत आहे. भर लोकवस्तीत सदर दुकान असल्याने दुकानात भंगार कापणे, लोखंडाचे तुकडे करणे, तेलाचे पिपे चापट करणे आदि वस्तु वाहणांद्वारे पाठविण्यायोग्य करण्यासाठी दररोज आदळ आपट, ठोकपीठ सुरू असते, त्यामूळे परिसरात मोठया प्रमाणांत आवाज होतो, यामूळे विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना आवाजाचा त्रास होत आहे. सदर दुकाना जवळ electric pol इलेक्ट्रीक खांब असून त्यावर डि.पी. लावण्यात आली आहे. सदर खांबाला लागुन भंगार दुकानातील प्लॉस्टीक वस्तुचा ढिगारा असल्याने भविष्यात केव्हाही विजेचा संपर्क होवून आग लागण्याची दाट शक्यता आहे. ऐन लोकवस्तीत असलेल्या दुकानातील प्लॉस्टीक वस्तुला आग लागल्यास मोठया प्रमाणांत जीवहानी होऊ शकते. सदर दुकानात विक्री करीता आणलेले अनेक भंगार साहित्य, खरडे, प्लॉस्टीक विक्री योग्य नसल्यास इतरत्र फेकुन देतात. त्यामूळे परिसरात दुर्गंधी व धाणीचे साम्राज्य पसरत आहे. सदर दुकानात खरेदी केलेले भंगार साहित्य विक्री करीता नेत असतांना ट्रक किंवा इतर जड वाहण वार्डातील नागरीकांच्या ये-जा करण्याचा मार्गावर उभी ठेवली जातात. त्यामूळे नागरीकांना ये जा करणे अडचणीचे जात असून याबाबत सदर भंगार विक्रेता किंवा वाहण चालकांस काही बोलले तर सदर व्यवसायाशी जुळलेली मंडळीच नागरीकांवर उर्मट भाषेत बोलत तुटुन पडतात नव्हे तर देख लुंगा म्हणत धमकीही देत असतात. याबाबत वार्डातील नागरीकांना अनेकदा नगर परिषदे कडे तक्रारी केल्या परंतु सुस्सावलेले नगर प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. नागरीकांना त्रास होणारे भंगार दुकान लोकवस्ती मधून शहरा बाहेर हलविण्याचा ठराव सर्वानुमते घेवुनही नगर प्रशासन लोकवस्तीमधील भंगार दुकान शहराबाहेर हलविण्यास कां बर दुर्लक्ष करीत आहे?, असा प्रश्न वार्ड क्र. १० व ११ मधील नागरीकांना पडला आहे. याबाबत नगर प्रशासना सोबतचं पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानतर ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांनी सदर स्थळी प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा नागरीकांची समस्या गंभीर आणि वास्तविक असल्याने त्यांनीही नगर प्रशासनाला सदर भंगार व्यवसाया विरूध्द कारवाई करावी, असे कळविले आहे. आठवडया भरात नगर प्रशासनाने सदर scrap business भंगार व्यवसाय तात्काळ बंद करावा अन्यथा भंगार व्यवसाय आणि कारवाई करण्यास असमर्थ ठरलेल्या नगर प्रशासना विरूध्द वार्डातील नागरीक प्राणांतीक उपोषणास बसतील. असा इशारा पर्यावरणप्रेमी उमेशसिंह झिरे, राजु पुल्लावार, रविंद्र तुपकर, प्रमोद गेडाम, बबलु आयलानी यांचेसह अनेक महिलांनी दिला आहे.
जनआक्रोशा मूळे नगर प्रशासनाला आली जाग
शहरातील वार्ड नं. १० व ११ मधील नागरीकांची संयुक्त तक्रारीची दखल घेवुन मुख्याधिकारी मेश्राम यांनी सहकारी आणि पोलीसांसह सदर व्यवसायाचे ठिकाणी भेट दिली. वास्तविक पाहणी करून तीन दिवसात भंगार साहीत्य हलविण्याचे निर्देश दिले. अन्यथा प्रशासन कारवाई करेल. अशी लेखी सुचना दिली. त्यामुळे घाबरलेल्या भंगार विक्रेत्याने भंगार साहीत्य हलविण्यास संमती देत सात दिवसाची मुदत दिली. सात दिवसात लोकवस्ती मधील सदर व्यवसाय बंद न झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मत मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी व्यक्त केले.
