राजुरा - पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत 19 वर्षीय आशुतोष अशोक निमकर रा.चुनाळा या युवकाला अटक करण्यात आली.
अटकेतील युवक आशुतोष जवळून 3 लोखंडी पात्याची Sword तलवार अंदाजे किंमत 70 हजार, 2 अँड्रॉइड मोबाईल किंमत 45 हजार व एक मोटार सायकल किंमत 60 हजार असा एकूण 1 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनातं पोलीस निरीक्षक एस. व्ही. बहादुरे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे API दरेकर, पोलिस हवालदार खुशाल टेकाम. रवींद्र नक्कनवार. किशोर तुमराम, योगेश पिदूरकर, रामराव बिंगेवार, संदीप बुरडकर यांनी केली. Indian Weapons Act
