कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ओबीसी युवा मंचातर्फे गडचांदूर येथे 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथील मालपाणी सेलिब्रेशन हॉल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व भव्य ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.यात प्रा.नितेश कराळे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे.स्वतंत्र भारतात शासनकर्त्यांनी एकदाही जाती आधारीत जनगणना व ओबीसींची जाती आधारीत जनगणना न करणे म्हणजे ओबीसींना संवैधानिक हक्क अधिकार व प्रतिनिधित्वपासून जाणीवपुर्वक वंचित ठेवण्यासाठी केलेले एक Terrible conspiracy भयानक षडयंत्र असल्याचे दिसून येते. ओबीसींच्या मतांवर निवडून येण्यासाठी निवडणुक जाहीरनाम्यात आम्ही ओबीसींची जातनिहाय जनगणना करू असे आश्वासन देणे आणि निवडून आल्यानंतर आश्वासन न पाळता उलट सर्वोच्य न्यायालयात Caste wise census of OBCs ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही असे लिहून देणे, ही ओबीसींसोबत केलेली सर्वात मोठी धोकेबाजी,याविषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे. Nitesh karale
याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.नितेश कराळे संचालक फिनिक्स अकॅडमी वर्धा व श्री उमेश कोराम अध्यक्ष,स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया (जे.एन.यु.)असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर अडबाले शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था मर्या.चंद्रपूर तर उदघाटन माजी प्रा.गिरीधर बोबडे यांच्या हस्ते होणार आहे.गडचांदूर न.प.उपाध्यक्ष शरद जोगी स्वागताध्यक्ष तर विशेष अतिथी म्हणून न.प.नगराध्यक्षा सौ.सवीता टेकाम व शिवब्रिगेडचे अध्यक्ष सतीश मालेकर हे असणार आहे.नागरिकांनी मोठ्यासंख्यने उपस्थित राहून या ओबीसी परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन ओबीसी युवा मंचाचे प्रवीण काकडे,सुनील अरकिलवार, करणसिंग भुराणी,प्रवीण मेश्राम,गणेश लोंढे,अरविंद वाघमारे,मुनीद शेख,नितेश भिवापुरे, अभिषेक तुराणकर, सुरज जुनघरे सह इतरांनी केले आहे.
