राजुरा - चंद्रपूर जिल्ह्यात मध्यंतरी शिवसेना काही काळ कार्यकर्ते व नागरिकांच्या संपर्कात नव्हती मात्र जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची सेनेत वर्णी लागल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांची जणू फौजच उभी केली.
सध्या जिल्हाभरात शिवसेनेचे मेळावे सुरू आहे, 27 नोव्हेम्बरला राजुरा येथे मेळाव्या प्रसंगी भविष्यात राजुरा तालुक्यात शिवसेना निवडणुकीचा निकाल ठरविणार असे वक्तव्य जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केले, त्यांच्या वक्तव्याने कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली.
Sandip Girhe
राजुरा विधानसभा ही ऐके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता परंतु मध्यंतरी काळात राजुरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेत दुफळी निर्माण झाली परंतु ती दुफळी आता संपूर्ण बाजूला ठेवून आजी माजी पदाधिकारी यांनी मिळून पक्षासाठी काम करून संपूर्ण तालुक्यात शिवसेनेच्या शाखा स्थापित करून संपूर्ण ग्रामीण भागात आणि शहरात शिवसैनिक तयार करण्याचे आदेश दिले. Shivsena chandrapur
येणाऱ्या निवडणुका ह्या सामान्य शिवसैनिकांच्या निवडणुका आहे जे आता पदाधिकारी आहेत त्यांच्या कडून कोणतीही हलगर्जीपणा सहन करून घेणार नाही जर पदाधिकारी आपल्या पदाला न्याय देऊ शकत नसेल तर स्वतः समोर येऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन नवीन व्यक्तींना पदाधिकारी नेमून मार्गदर्शन करावे.
भविष्यात येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये निकाल चांगले येतील आणि शिवसेनेच्या बालेकिल्ला अभेद राहील.
मेळाव्याला राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, कुसुम ताई उदार माजी जिल्हा संघटिका महीला आघाडी, वासुदेव चापले राजुरा तालुका प्रमुख शिवसेना, बल्लारपूर तालुका समनवयक प्रदीप गेडाम, स्वप्नील काशीकर,शहर प्रमुख निलेश गंपावार, शहर समन्वयक बबलू चौहान आणि आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
