चंद्रपूर - 13 नोव्हेम्बरपासून कांग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राजकारण पूर्णतः बदलून गेले, कांग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश मेंढे यांना मारहाण झाल्यावर अनुसूचित जाती विभाग 2 गुटात विभागून गेला.
1 गट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे विरोधात तर दुसरा गट त्यांच्या समर्थनात होता, मारहाण प्रकरण घडल्यावर कांग्रेस अनुसूचित जाती विभागाने कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नये अश्या सूचना दिल्या होत्या.Suspension
मात्र काहींनी पक्ष श्रेष्ठीचा आदेश झुगारून लावला.
अश्यातच कांग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांनी संविधान सन्मान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले मात्र हा कार्यक्रम त्यांचं राजकीय आयुष्य बदलवून टाकेल याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. Scheduled Castes Department, Chandrapur Congress
त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चक्क शहर अध्यक्षाचं नाव निमंत्रण पत्रिकेतून डावलले, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांचं नाव ही पत्रिकेत समाविष्ट केले नाही. दहेगावकर यांनी त्या निमंत्रण पत्रिकेत सोनिया गांधी, राहुल गांधी, एच.के. पाटील, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, मनोज बगाडी, सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचे निमंत्रण पत्रिकेवर फोटो ही टाकला नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांना सदर कार्यक्रम आयोजनाची साधी सूचना ही दिली नाही, ज्यामुळे प्रोटोकॉल चे उल्लंघन अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा अध्यक्ष अनु दहेगावकर यांनी केल्याने अनुसूचित जाती विभागाच्या राज्य समनव्यक प्रतिमा उके यांनी दहेगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
चंद्रपूर मनपाची निवडणूक तोंडावर असताना प्रदेश उपाध्यक्षाला राष्ट्रीय अध्यक्षसमोर मारहाण झाल्याने सदर प्रकरण चांगलेच तापून गेले आहे, याप्रकरणाचा फटका पुढील निवडणुकीत दिसेलचं.

