प्रतिनिधी/रमेश निषाद
विसापूर :- मधील वॉर्ड 2 व्यायाम शाळेचे शौचालय बाथरूमचे बांधकाम मंजूर झाले असून लवकरच बांधकाम पूर्ण करून साहित्य देऊन Gym व्यायाम शाळा सुरू होणार. चंद्रपूर जि. बल्लारपूर ता विसापूर गावामधील वॉर्ड 2 हनुमान मंदिर जवळील व्यायाम शाळेचे अर्धवट शौचालय बाथरूमचे बांधकाममुळे मागील 3 ते 2 वर्षां पासून व्यायाम शाळेचे साहित्य नव्हते आले, त्यामुळे व्यायाम शाळा सुरू झाली नव्हती, म्हूणन प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा अंतर्गत किशोर पंदीलवार यांना निवेदन मार्फत कळविण्यात आले कि व्यायाम शाळेचे शौचालय बाथरूम चे बांधकाम पूर्ण करून साहित्य देऊन व्यायाम शाळा सुरू करण्यात यावे तसेच शौचालय बाथरूम च्या बांधकाम मंजूर करून दिले, त्याबद्दल पंदिलवार यांचे युवक कांग्रेसने आभार मानले आहे.
