चंद्रपूर - छठ पूजा हा भगवान सूर्य आणि छठ माता ला समर्पित एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो दिवाळीच्या 7 दिवसा नंतर साजरा केला जातो कार्तिक च्या पवित्र महिन्यात हा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत असतो चंद्रपुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय समाजाच्या वतीने हा छठ पूजेचा पवित्र उत्सव साजरा करण्यात आला त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी चंद्रपूर महानगरातील छठ पूजेच्या विविध पवित्र स्थळी भेट दिली व मनोगत व्यक्त करतांना सांगितले की छठ पूजा ही सर्वांच्या घरी सुख,शांती व समृद्धी प्रदान करो व भाविकांच्या मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण करो असे त्यांनी यावेळी सांगितले. CHHAT Pooja
सदर छट पूजाच्या पवित्र स्थळी भेट देतांना साहित्याचार्य मथुरा प्रसाद पांडे, भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी,भाजपा सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर,शिवमंगल यादव,गिरिष गुप्ता,रामकुमार मौर्य, रंजनसिंग ठाकूर, राकेश मिश्रा, आनंद झा,राजेश यादव,अनिष दिक्षित, विजयशंकर शुक्ला, कन्हीय्या यादव,श्रीकांत राम, रामफेर राम, गौतम शर्मा,रोहित यादव,मोहन यादव, सुरेंद्र चौरसिया, इंद्रजित यादव,धिरेंद्र सिंग,प्रलय सरकार, रोशन सिंग, उमेश केवट, अशोक यादव,विष्णू यादव,विक्की यादव यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
