प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला. शिवाय भाजप शासीत राज्यातही कर कमी केला गेला. पण, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने कर कमी केले नाही. हे सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करणारे भकास सरकार असल्याचा टिका जिल्हा परिषद अध्यक्षा तथा मूल भाजपाच्या तालुका अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी केली. Petrol diesel
केन्द्र सरकारने दिवाळीच्या पुर्व संध्येला पेट्रोल वरील ऍक्साईज कर 5 रूपये प्रतिलीटर तर डिझेलवरील ऍक्साईज कर 10 रूपये प्रतिलिटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंन्द्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकुण करांचा परिणाम ध्यानात घेता महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल 6 रूपये व डिझेल 12 रूपये स्वस्त झाले आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पार्टी मूल च्या वतीने मागणी करण्यात आली. भाजपा मूल शहर व मूल तालुका भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रोश आंदोलन व निषेध मोर्चा दिनांक १२ नोव्हेंबर ला दुपारी १२.०० वाजता गांधी चौक ते तहसील कार्यालयासमोर काढण्यात आला. हे आंदोलन जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अध्यक्षा तथा मूल तालुका भाजपा अध्यक्षा सौ संध्याताई गुरनुले, शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी चंदू मारगोणवार सभापती पंचायत समिती, सौ रत्नमाला भोयर नगराध्यक्ष नगर परिषद, श्री नंदू रणदिवे उपनगराध्यक्ष नगर परिषद, श्री प्रशांत समर्थ सभापती नगर परिषद, बंडू नर्मलवार सरपंच उश्राला, नितीन गुरनुले सरपंच फिस्कुटी, भिकारुजी शेंडे सरपंच, प्रशांत लाडवे नगरसेवक, सौ विद्या बोबाटे, आनंद पाटील ठिकरे माजी सरपंच, विवेक ठिकरे, सचिन गुरनुले युवा कार्यकर्ता, प्रदीप वाढई सरपंच, राकेश गिरडकर उपसरपंच, तुषार ढोले, दिलीप पाल, संजय येनूरकर माजी सरपंच, विनोद सिडाम नगरसेवक, माळी महासंघ अध्यक्ष राकेश ठाकरे ओबीसी सेलचे नेते, अनुप नेरलवार उपसरपंच, शुभम समर्थ युवा कार्यकर्ता, दादाजी येरणे, अविनाश वरघंटीवर, उमेश ढोले, प्रमोद कोमुलवार, सौ कल्पना पोलोजवार सोशल मिडिया प्रमूख,नगर सेवक सौ आशा गुप्ता, अनिल साखरकर,सौ लिनाताई बद्वेलवार, सौ वंदना वाकडे, रुपेश वाकडे, मिलिंद खोब्रागडे, अशोक वाकडे, प्रमोद कडस्कर, राहुल झोलमवार, निलदेव भुरसे, नामदेव खोब्रागडे, संदीप गेडाम, सुरज मंडलवार, विवेक मांदाळे, सुरज मांदाळे, रमेश टिकले, नंदू वाढई, व संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते.
यापूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी केंद्रासरकारच्या विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आपल्या आघाडी सरकारने कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे. हि जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापी अजुनही आघाडी सरकारकडुन टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षाची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपाशाशी त राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही.
राज्यात डिझेलवर 24 टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आकारला जातो.त्या खेरीज पेट्रोलवर प्रति लिटर 9 रूपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागु केलेल्या करासाठी 3 रूपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी 30 ते 40 रूपये प्रति लिटर मिळतात. आघाडी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी 5 रूपये तर डिझेलसाठी 10 रूपये सवलत द्यावी. तसेच राज्यात दुष्काळी स्थिती नाही. त्यामुळे पेट्रोलवरील प्रति लिटर 3 रूपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी. पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न केल्यास भाजपा तीव्र आंदोलन उभारेल असे मोर्चादरम्यान सांगण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयात भाजपाच्या वतीने सौ.संध्याताई गुरनुले यांच्या नेतृत्वात तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांना पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. आक्रोश मोर्चात तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
▶️पेट्रोल,डिझेलचे दर कमी करा,भाजप आक्रमक.
▶️कोरपना येथे महाआघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने
गडचांदूर :- पेट्रोल,डिझेलचे दर कमी करा या मागणीला घेऊन कोरपना तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात कोरपना येथे भाजपतर्फे महाआघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.केंद्र सरकारने दर कमी केले आता महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करावी यासाठी भाजपतर्फे 12 नोव्हेंबर रोजी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. याच श्रेणीत कोरपना येथेही राज्याच्या महाआघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तहसिलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आला.यावेळी गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,कवडू पाटील जरीले, तालुका उपाध्यक्ष पुरूषोत्तम भोंगळे,माजी सरपंच अरूण मडावी,पं.स.सदस्य नूतन कुमार जिवणे, माजी नगरसेवक अमोल आसेकर,माजी सरपंच प्रमोद कोडापे, शंकरराव चिंतलवार आदींची प्रामुख्याने तसेच तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.

