गडचांदूर :- घराची रंगरंगोटी करताना घरा वरून गेलेल्या जीवंत विद्युत तारेला अचानकपणे स्पर्श झाल्याने 13 आक्टोंबर रोजी सिद्धार्थ विहार गडचांदूर येथील अस्थाई मजदूर अविनाश पोचूजी रामटेके हा 90 टक्के जळाला होता. National General Trade Union
सध्या अविनाश वर सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.दरम्यान गडचांदूर शाखा राष्ट्रीय जनरल मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी अविनाशची रूग्णालयात प्रत्यक्ष भेट घेतली.विचारपूस केल्यानंतर फुल नाही तर फुलाची पाकळी याप्रमाणे अविनाशला आर्थिक मदत दिली.युनियनचे अध्यक्ष जोगेश सोनडूले, गडचांदूर शाखा अध्यक्ष सुनील फुलझेले, सल्लागार प्रभाकर खाडे, देवानंद वाटगूरे, पुरूषोत्तम सोरते, शंकर झुंगरे,शाम खुशालराव ठमके, मोरेश्वर चांदेकर,दिनेश नांदूरकर,महेंद्र गिलबिले, अजय मारोती पाल,रमेश सुदर्शन मडावी, देवीदास राघोजी टेकाम,शंकर भगत, प्रियोबाला गावंडे,धनपाल वानखेडे इत्यादींनी आर्थिक स्वरूपी सहकार्य केले.
