प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री, राज्याच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार श्री.शरद पवार साहेबांकडून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. Ncp sharad pawar
पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागातील निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्यांची नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणारे आणि सरकारकडून मदत मिळवून देणारे राष्ट्रवादीचे नेते श्री. शरद पवार यांचेकडून अवकाळीग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांचा मात्र अपेक्षाभंगच झाला आहे.
श्री. शरद पवार यांचे मूल दौऱ्याच्या दोन दिवस आधीच मूल-सावली तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला. शेतात कापून ठेवलेले धान अक्षरशः वाहून गेले. आणि जागेवर असलेले धानाच्या सरड्या वापुन गेल्याने सावली, खेडी, परिसरातील गावातील शेतकरी 90-100 किंबहुना अधिक पोते धान घरी न्यायचे पण यावर्षी एकही पोता धानाचा घरी नेणार नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. Pawarspeakes
हजारो शेतकऱ्यांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावून घेतल्यानंतर, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांचे हिताबद्दल बोलणारे माजी कृषीमंत्री श्री. शरद पवार मुल-चंद्रपूर दौऱ्याच्या मार्गातच सावली-खेडी व इत्यादी गावातील अवकाळी पावसाचे बळी पडलेले शेतकरी वाटेतच असल्याने या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतील अशी अपेक्षा होती. मात्र पवार साहेबांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. आपल्या भाषणातही याबद्दल अवाक्षर काढले नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्यासोबत पत्रव्यवहार करू एवढाच काय शब्दाचा दिलासा, तो धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला. आणि जाहीर सभा संपली. हेच या जाहीर सभेचे फलित, चर्चा मात्र नगर परिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती व पुढील विधान सभेच्या निवडणुकीची.