चंद्रपूर - राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ भारत सरकारच्या श्रमिक मंत्रालया कडून Registered असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संघटन विरहित कर्मचाऱ्यांचा गेल्या एक आठवड्यापासून हक्क अधिकारासाठी निरंतर संप सुरू आहे. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखा महाराष्ट्रच्या वतीने एस.टी. महामंडळातील कामगार, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आणि अधिकारासाठी रस्त्यावरची लढाई मागील एक वर्षांपासून लढत आहे आणि यापुढेही लढत राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य शाखा आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखा महाराष्ट्र च्या वतीने दोन चरणातील आंदोलन दिनांक 3 नोव्हेंबर 2021 पासून दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पर्यंत काळीफित आंदोलन आणि दिनांक 10 नोव्हेंबर 2021 ला एकाच दिवशी महाराष्ट्रातील 36 ही जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन करण्यात येत आहे. Msrtc Merge.
या आंदोलनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत 1) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विलनिकरण महाराष्ट्र राज्य शासनात त्वरित करा. 2) आत्महत्या केलेल्या ST कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पन्नास लाख रुपये त्वरित देऊन परिवारातील एका सदस्याला महिन्याभरात नोकरी द्या. 3) एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे थकीत करारासह पुढील करार त्वरित करा. 4) अन्यायकारी शिस्त व आवेदन प्रणाली त्वरित रद्द करा. 5) कर्जबाजारी केलेल्या एस.टी. महामंडळातील कामगार कर्मचाऱ्यांचे ST कोपरेटिव्ह बँकेचे कर्ज माफ करा. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.
2013 मध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की, आमची सत्ता महाराष्ट्रात आल्यास एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्यात येईल, सन 2014 ते 2019 पर्यंत भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीचे सरकार सत्तेवर असतांना एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण का केले नाहीत? सन 2016 ला असेच ऐन हंगामाच्या वेळी याच मान्यताप्राप्त आणि कृतीसमितीने कोणत्याही संपाची नोटीस न देता बेकायदेशीर 2 दिवसीय संप घडवून आणला होता, त्याच पद्धतीने सन 2017 ला 4 दिवसीय संप घडवून आणला होता, दोन्ही संपाच्या वेळी भाजपाचे सरकार सत्तेत असतांना कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली होती. मग आता भाजपाचेच बांडगुळ आमदार हे एस.टी. कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर संप करायला लावून दिशाभूल करीत आहे. यावर एस.टी. कर्मचाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने चिंतन व समिक्षा करण्याची गरज निर्माण झाली आहे. National Indigenous Bahujan Karmachari Sangh
यासह एस.टी. महामंडळातील काम करणाऱ्या बांधवांना अपील करण्यात येते की, आपण आत्महत्या न करता धैर्याने, संयमाने आपले एस.टी. महामंडळ राज्य शासनात विलनीकरण करण्यासाठी आणि इतर संविधानिक न्याय, हक्क अधिकारासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनची MSRTC या विंग सोबत राहून दोन्हीही टप्प्यातील काळीफीत आंदोलन आणि जिल्हास्तरीय धरणा आंदोलन मोठ्या प्रमाणात सफल करण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.
