चंद्रपूर - पुलवामा सारख्या क्षेत्रात देशसेवा करणाऱ्या भारतीय सैन्यातील जवानाने जेव्हा पडोली वासीयांच्या स्वागताला नतमस्तक झाले आणि पडोली वासीयांना मोलाचा सल्ला देत सर्वांचे मन त्या जवानाने जिंकले.
मोहन पारवे हा जवान यवतमाळ जिल्ह्यातील परतवाडा येथील हरमगाव येथे राहणारा आहे. Pulwama
अचानक मोहन हा कामानिमित्त पडोली क्षेत्रात आला याबाबत नागरिकांना माहिती मिळाली व त्यांनी मोहन पारवे या जवानांचे देशसेवेसाठी आभार मानत स्वागत केले. Army man
यावेळी मोहनने पडोली वासीयांना महत्वाचा सल्ला देत "किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं...
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं..."
आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात रहावं लागतं...!!
छोट्याशा गावात राहून मोहनने आपल्या जिद्द व चिकाटीने देशसेवेचा प्रण हाती घेत सैन्यात दाखल झाला.
यावेळी युवकांना मोहनने मार्गदर्शन केले, युवकांनी देशसेवेसाठी पुढाकार घेत सैन्यात दाखल व्हावे असा सल्ला दिला.
यावेळी पडोली येथील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.