प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या नागपूर विभागाच्या उपाध्यक्षा सौ.तेजस्विनी नागोशे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सर्वांचा आवडीचा, उल्हासाचा, औत्सुक्याचा, आनंदाचा, उत्कर्षाचा, दिवाळीच्या सणाच्या दिवशी मुल येथील रेल्वेस्टेशन मागील झोपडपट्टी मधील अतिशय गरीब,गरज,निराधार, लहान मुलां-मुलींना, महिलांना, पुरुषांना दिवाळी फराळ व अंगावर घालण्याचे अत्यावश्यक कपडे वाटप करण्यात आले. Dipawali
या अभिनव उपक्रमाच्या पूर्वी नेफडो च्या नागपूर विभागीय सचिव रत्ना चौधरी यांनी संचालनामधून संस्थेचा परिचय करून दिला. तर प्रास्ताविक नागपूर विभागाच्या उपाध्यक्षा तेजस्विनी नागोशे यांनी संस्थेचे कार्य आणि विविध अभिनव उपक्रमाबद्दल माहिती दिली. व आपल्या वाढदिवसानिमित्त उपस्थित गरीब,गरजूंना दिवाळी फराळाचे व कपड्याचे वाटप सुरु केले. याप्रसंगी उपस्थित चंद्रपूर जिल्हाध्यक्षा ललिता मुस्कावार, जिल्हा सचिव सुषमा कुंट!वार, जिल्हा संघटिका कविता मोहूर्ले, मुल तालुका अध्यक्षा मीराताई शेंडे, उपाध्यक्षा अल्काताई राजमलवार, तालुका संघटिका वंदना गुरनुले, नंदा शेंडे, इंदू वाढई, माधुरी गुरनुले, सौ.सुजाता बरडे, कल्पना मेश्राम, गौरी चौधरी, जिल्हा संघटक श्रीरंग नागोशे, गुरुदास चौधरी, सल्लागार गुरु गुरनुले, आदी उपस्थित राहून नागरिकांना फराळ व कपडे वाटपात सहकार्य केले. ऐन दिवाळी सारख्या सणाच्या शुभ पर्वावर दिवाळी फराळ व कपडे गरिबांच्या हातात मिळाल्याने गरजूंच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद दिसून येत होता. फराळ व कपडे घेणाऱ्या गरजू गरिबांनी संस्थेच्या सर्व महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन आभार मानले.
