प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - रस्त्याची दिशा लक्षात न घेता लाखो रूपये खर्च करुन नहरावर दोन पूल बांधण्यात आले परंतु त्या दोन्ही पुलावरुन चारचाकी, दुचाकी वाहतूक सुद्धा होत नसल्याने दोन्ही पूल शोभेचे ठरले आहे. करिता जनतेची वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन संबंधित पाटबंधारे विभागाचे परिसरातील नागरिकांसाठी वाहतूक त्वरित कशी सुरु करता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मुल तालुका सरपंच समितीचे अध्यक्ष, भेजगावचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिल गांगरेड्डीवार यांनी केली आहे.
जनतेच्या सोयीसाठी २०१४ मध्यें शासनाच्या पाटबंधारे विभागाने तालुक्यातील गडीसुर्ला आणि चक दुगाळा गांवाजवळून गेलेल्या आसोलामेंढा नहरावर लाखो रूपये खर्चून पुलाचे बांधकाम केले. दोन्ही पुलाचे बांधकाम पुर्णत्वात आले. परंतु पुलाचे काम योग्य की अयोग्य होत आहे याचा अभ्यास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही. म्हणून दोन्ही पुल तांत्रीक अडचणीमूळे आजही शोभेचे ठरत आहे. नहराद्वारे शेतीला पाणी पुरवठा करतांना नागरीकांना रस्त्याने ये-जा करणे सोईचे व्हावे म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने गडीसुर्ला आणि चकदुगाळा ते बेंबाळ ग्रामीण मार्गावर अश्या दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम केले. ज्या ठिकाणी पुल बांधकाम करण्यांत आले त्या ठिकाणाहून सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिनस्त असलेला ग्रामीण मार्ग समोर जातो. सध्यास्थितीत या दोन्ही ग्रामीण मार्गामधून जाणा-या आसोलामेंढा नहरावर पुल असून हे दोन्ही पुल अनेक वर्षापूर्वी बांधलेले असल्याने कमी उंचीचे व अरूंद आहेत. नहराचे पाणी सोडल्यानंतर या कमी उंचीच्या दोन्ही पुलावर धोका होण्याची शक्यता लक्षात घेवून २०१४ मध्यें पाटबंधारे विभागाने पुल बांधकाम हाती घेतले. परंतु रस्त्याची दिशा, उंची याची वास्तविक भौगोलीक स्थिती लक्षात न घेता दोन्ही ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यांत आल्याने हे दोन्ही पुल योग्य अलाईनमेंट अभावी वाहतुकीसाठी बिनकामाचे झाले आहे. त्यामूळे मागील कित्येक वर्षापासून जुन्याच पुलावरून नाईलाजाने नागरिक कसेतरी जाणे येणे करीत आहेत. पुल बांधकाम करतांना पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन तज्ञ अभियत्यांनी रस्त्याची दिशा लक्षात घेतली असती तर अलाईनमेंटची समस्या आज उद्भवली नसती. परंतू दोन्ही पुलाचे अलाईनमेंट बरोबर नसल्याने लाखो रूपये किंम्मतीचे हे दोन्ही पूल मागील तीन वर्षापासून शोभेचे ठरत आहे.
पुलाची समस्या त्वरित सोडवावी- सरपंच गांगरेड्डीवार यांची मागणी
नहरावर बांधकाम करण्यांत आलेले दोन्ही पुल तत्कालीन अधिका-यांच्या चुकीमूळे आज बिनकामाचे ठरले आहे. नागरीकांना आजही जुन्याच पुलावरून ये जा करावे लागते. बांधकामा करीता नागरीकांच्या हक्काचे लाखो रूपये खर्चून आज त्याचा योग्य वापर होत नसल्याने लाखो रुपये पाण्यात गेले फार मोठी ही शोकांतीका आहे. या दोन्ही मार्गाचा तिढा संबंधीत विभागाने या वर्षाच्या अखेर पर्यंत सोडवावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर आणि सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अखील गांगरेड्डीवार यांनी दिला आहे.
