प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - केंद्र सरकार रेडिमेड व कापड उत्पादनावरील GST १ जानेवारी २०२२ पासून ५ टक्यावरून एकदम १२ टक्के करण्यात आली आहे. हे उत्पादने जीवनावश्यक श्रेणीमध्ये मोडत असल्याने टॅक्स वाढीचा भुर्दंड सरळ जनतेवर बसणार आहे. आणि मागील दोन वर्षांच्या काळात कोविड-१९ मुळे व्यापारी आणि सर्व सामान्य जनता अजुनही त्रस्त झाली आहे. हलाखीची झालेली आहे. त्यामुळे लाकडाऊन नंतर येणारी GST वाढ त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी व्यापारी बांधकडून असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. Textile माणसाच्या दैनंदिन जीवनात रोटी-कपडा-और मकान या प्राथमिक गरजा अतिशय महत्वाच्या मानल्या जातात आणि कपडा यावरील GST मध्ये अचानक एकदम वाढ केली असून ती वाढ १ जानेवारी पासून लागू करीत असल्याचे दिसून येत आहे. करिता वाढ केलेली GST ची दरवाढ कमी करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. हा निर्णय केंद्र सरकारने देशातील कोणत्याही व्यापारी संघटनेला विश्वासात न घेताच एकतर्फी निर्णय घेतला असून याबाबत व्यापारी बांधवां सोबत, असोसिएशन सोबत पहिले चर्चा करावी व नंतरच सकारात्मक GST वाढीचा निर्णय घ्यावा .अन्यथा दर वाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही व्यापारी असोसिएशन तर्फे देण्यात आला . उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देतांना सारडा कलेक्शन,बाबा रेडिमेड, न्यू कलेक्शन,संस्कृती साडी सेंटर, त्रिवेणी कलेक्शन,सिटी फॅशन, दिया साडी सेंटर,शारदा ड्रेसेस, सिटी लुक्स,दत्त साडी सेंटर, मणियार कलेक्शन, सूचक साडी सेंटर,निर्मल कपडा बाजार तर्फे गणेश पडगेलवार, बंडू गोगीरवार, मेहुल मणियार, शाम केशवानी, दीपक काळे, बाळू लाडवे, अब्दुल गफ्फार, नितीन आगडे, उपस्थित होते. देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह, वित्त मंत्री मा.निर्मला सीतारामन, यांनाही पाठविले आहे.
