चंद्रपूर - सामाजिक समता संघर्ष समिती चंद्रपूरच्या वतीने संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर ला व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. रेहमत नगर मधील के. जी. एन. हॉल मध्ये सायंकाळी 6 वाजता सदर कार्यक्रम होणार आहे. Constitution Day
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष हाजी सय्यद अनवर अली राहतील तर संविधानाचे अभ्यासक बळीराज धोटे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.सोलापूर येथील सुप्रसिद्ध लेखक सरफराज अहेमद,राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे प्रवक्ता ऍड. रफिक शेख, रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष रामसिंग सोहेल, माहिती अधिकार प्रचार व प्रसार संस्थेचे जिल्हाध्यक्ष नितीन बन्सोड, भीम शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय दुर्गे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख यांनी केले आहे.
