प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल : 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मुल गडचिरोली रोड वर आशिष फ्लाउड दुकाना समोर एका अपघातात ट्रक वाहन क्रं.CG.08Y2011 च्या धडकेत एक व्यक्ती जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव रतन मारोती तलांडे वय वर्षे 62 असुन ते सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी असुन मुल येथील रहिवासी होते, गाडी क्रमांक. MH34Z3351 असुन गांधी चौक कडे जात असतांना ट्रक ने मागुन धडक दिली, धडक ईतकी जोरदार होती की मृतकाचे शरीर पुर्ण छिन्नविच्छिन्न झाले, मृतदेह ग्रामिण रूग्णालय मुल येथे पोलिसांनी पाठवले असुन तपास मुल पोलिस करीत आहॆ.
दुकानदारांच्या अतिक्रमनामुळे आज हा अपघाताला कारणीभूत ठरला अशी जनतेत दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. Accident
धडक देणाऱ्या ट्रक च्या ड्रायव्हरला घटनास्थळावरून अटक केली असून, मृतक हा ट्रकच्या चाकाखाली दबून छिन्नविच्छिन्न झाला, अपघाताच्या ठिकाणी रस्त्याची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाल्याने संपूर्ण वाहतूक एकाच मार्गाने करावी लागली होती. अपघात घडल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली.
शहरात मोठमोठ्या व्यवसायीकानी पार्किंग च्या जागेवर गट्टू चा ठिकाणी आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर ठेवल्याने व तसेच अतिक्रमण धारकांनी निर्माण केलेली रस्त्यावर ची अडचण, आज त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे विदारक वास्तव चित्र दिसून आले आहे. पुढील तपास मुल पोलिस करीत आहे.
इसमाचा नाहक बळी गेल्यानंतर प्रशासन जागे सेवानिवृत्त पोलीस यांचा अपघातात दुपारी १-०० वाजता बळी गेल्यानंतर मुल नगर प्रशासन दुपारी ३-०० वाजता जागे झाले असून नगर प्रशासनातर्फे स्पीकर फिरवून मुल येथील मुख्य रस्त्यावरील दुकानदार व्यापारी बांधवांनी आपल्या दुकानासमोरील विक्रीसाठी ठेवलेले साहित्य त्वरित उचलावे, आपला दुकानाचा गाळा सोडून बाहेर कोणीही सामान ठेऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी सूचना वजा तंबी स्पीकर लावून नगरामध्ये फिरवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. नगर प्रशासनाने कदाचित ही सूचना यापूर्वी स्पीकर लावून दिली असती तर बिचाऱ्या इसमाचा बळी गेला नसता अशीही चर्चा मुल नगरात केली जात आहे.
